नाशिककरांनो, ही आहेत गणेश विसर्जनाची ठिकाणं

नाशिककरांनो, ही आहेत गणेश विसर्जनाची ठिकाणं

शहरात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केलेत. मिरवणुकीनंतर आता गणेश विसर्जनसाठीची सज्जता पालिकेने केली असून, शहराच्या सहा विभागांत ३२ कृत्रिम तलाव तयार केले जाताहेत.

गणरायाला रविवारी निरोप दिला जाणार आहे. प्रतिष्ठापना केलेल्या अनेक मूर्ती पीओपीच्या असल्याने त्या पाण्यात लगेचच विरघळत नाहीत. विसर्जनानंतर मूर्तींची विटंबना होते. यासोबतच नदी व पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. त्यामुळे महापालिकेच्या वतीनं दरवर्षी मूर्तीदान कार्यक्रमासह गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले जातात. यंदा महापालिकेनं ३२ कृत्रिम तलाव उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतलाय. यासोबतच पीओपीच्या गणेश मूर्तीपासून होणारं जलप्रदूषण रोखण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेटचं मोफत वितरण केलं जाणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केलंय.

‘टँक ऑन व्हील’ उपक्रम

गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन स्लॉट बूकिंगची सुविधा महापालिकेनं उपलब्ध करून दिलीय. महापालिकेच्या

https://nmc.gov.in/article/index/id/177#tabs|History:tab

या वेबसाईटवर नागरिकांना स्लॉट बूक करता येतील. याशिवाय प्रत्येक विभागासाठी एक याप्रमाणे ६ फिरते कृत्रिम तलाव पालिका उपलब्ध करुन देणार आहे. ५० किंवा त्यापेक्षा अधिक फ्लॅटस असलेल्या अपार्टमेंटसाठी हे टँक देण्याची तयारीही पालिकेने केलीय. नागरिकांनी रस्त्यावर अथवा विसर्जन ठिकाणी गर्दी होणार नाही व कोरोना प्रतिबंध होईल यासाठी ही व्यवस्था करण्यात आलीय.

विभागनिहाय विसर्जनाची ही आहेत ठिकाणं :

First Published on: September 17, 2021 11:35 PM
Exit mobile version