दारुने लिव्हर खराब होते; म्हणून लिव्हर तपासणीसाठी चक्क गटारीचा मुहूर्त

दारुने लिव्हर खराब होते; म्हणून लिव्हर तपासणीसाठी चक्क गटारीचा मुहूर्त

दारुने लिव्हर खराब होते; म्हणून लिव्हर तपासणीसाठी चक्क गटारीचा मुहूर्त

दारुमुळे शरीरातील लिव्हर खराब होते, त्यामुळे दारु पिऊ नये असा सल्ला डॉक्टर नेहमीच देत असतात. गटारी आमवस्येच्या दिवशीमात्र समस्त तळीरामांच्या विस्मृतीत हा सल्ला जातो. त्यामुळे जणू दारु आणि लिव्हर यांचा काही संबंधच नाही, असे वातावरण तळीरामांकडून तयार केले जाते. हीच बाब ओळखून महापालिकेने सफाई कर्मचार्‍यांच्या लिव्हर तपासणीसाठी चक्क गटारी’चा मुहूर्त शोधला. महापालिकेच्या मुख्यालयात सकाळपासून हे शिबिर सुरु आहे.

श्रावणमासाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. या काळात मांसाहार व मद्यमान निषीध्द मानले जाते. अर्थात ‘पीने वालो को पीने का बहाना चाहिये’ या गाण्याप्रमाणे गटारीच्या दिवशी भरपूर ढोसायची आणि श्रावणातही हा नित्यक्रम सुरु ठेवायचा असा बाणा अनेकांचा असतो. दररोज दारु ढोसून लिव्हरला सुज येते, त्यामुळे मृत्यूही संभवतो. या विषयीची जनजागृती वैद्यकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु दारु म्हणजेच विश्व बनलेल्या तळीरामांवर अशा जनजागृतीचा परिणामच होत नाही. गुढी पाडव्याच्या दिवशी लिंब झाडाचे, पोळ्याच्या दिवशी बैलांचे, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण-भावाच्या अतुट प्रेमाचे, दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे महत्व तर धनत्रयोदशीच्या दिवशी आरोग्याचे महत्व सांगितले जाते. त्या-त्या गोष्टीचे महत्व कळण्यासाठी दिनविशेष महत्वपूर्ण ठरते. याच धर्तीवर महापालिकेने दारुमुळे खराब होणार्‍या लिव्हरविषयी महत्व पटवून देण्यासाठी चक्क गटारी आमवस्येचा दिवस निवडला. बुधवारी (ता. २१) सकाळी १० वाजेपासून या तपासणी शिबिराला राजीव गांधी भवनच्या तिसर्‍या मजल्यावरील रेकॉर्ड हॉलमध्ये सुरुवात झाली आहे. रोटरी क्लब उत्तर व फोर्टिस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होत आहे. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित आहेत. कोणाचे लिव्हर किती प्रमाणात सुरू आहे. त्यांची कार्यक्षमताही यानिमित्ताने समोर येत आहे.

First Published on: July 31, 2019 1:57 PM
Exit mobile version