कारच्या धडकेत बारा वर्षीय मुलगी ठार

कारच्या धडकेत बारा वर्षीय मुलगी ठार

सिडकोच्या अंबड-सातपूर लिंकरोडवरील संजीवनगरात मंगळवारी (दि.१५) सकाळी झालेल्या अपघातात १२ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. मकरसंक्रातीच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास लान्सर कारने (एम. एच. ०२, के. ए. १३५०) अंजली गौड ( १२ ) हिला धडक दिली. अंजली ही घरासमोर काम करत बसली होती, तर तिची आई घराच्या ओट्यावर उन्हात बसलेली होती. कारच्या धडकेत डोक्याला मार लागल्याने अंजलीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असुन, कारसह कारचालकाचा साथीदार प्रितम कांबळे याला ताब्यात घेतले. कारचालक रूपेश हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

First Published on: January 15, 2019 9:30 PM
Exit mobile version