हॅशटॅग चिपको नाशिक चळवळ राज्याच्या सीमा ओलांडून गोव्यात

हॅशटॅग चिपको नाशिक चळवळ राज्याच्या सीमा ओलांडून गोव्यात

वृक्षतोड थांबवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देणार्‍या हॅशटॅग चिपको नाशिक चळवळीने जोर धरला आहे. राज्यभरात पोहोचलेली ही चळवळ राज्याच्या सीमा ओलांडून थेट गोव्यात पोहोचली आहे.

उत्तुंग झेप फाउंडेशनचे संस्थापक रोहन देशपांडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालयाने दि.८ मे २०१५ रोजी वृक्ष संवर्धनाबाबतच्या याचिकेची दखल घेऊन स्पष्ट आदेश दिले होते. मात्र त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. नाशिकसह राज्यात सर्वत्र अवैध वृक्षतोड करण्यात येत आहे. सध्या नाशिकमधील २९ वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला असतांना हॅशटॅग चिपको, नाशिक चळवळ त्याविरोधात ठामपणे उभी राहिली. त्यामुळेच संबंधित यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. हे चळवळीचे यश असून त्यामुळे वृक्षांची कत्तल होण्यावर नियंत्रण येईल. यासंदर्भात मनपा आयुक्तांशीदेखील चर्चा झाली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जनजागृतीमुळे चळवळीला व्यापक स्वरूप आले आहे. गोव्यातून अनेकांनी संपर्क साधून तेथेही चळवळीला बळ दिले. आम्ही लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची तसेच गोव्यातील मंत्र्यांची भेट घेणार आहोत, असेही देशपांडे यांनी सांगितले.

हॅशटॅग चळवळीच्या नाशिक, राज्य व गोवा अशा तीन स्वतंत्र मध्यवर्ती समित्या येत्या काही दिवसांत तयार होतील. प्रत्येक समितीत १० पर्यावरण तज्ज्ञ, अभ्यासू कार्यकर्ते यांचा समावेश असेल. जास्तीत जास्त तरुणांनी चळवळीत सहभागी होऊन लोकसहभागातून पर्यावरण रक्षण, संवर्धन यासाठी कटिबद्ध व्हावे. ह्यासाठी संपर्क 8007765777 किंवा uttungzepfoundation मेल करावा असे आवाहन रोहन देशपांडे व सहकार्‍यांनी केले आहे.

First Published on: June 16, 2021 8:00 PM
Exit mobile version