पहिल्या लग्नाची माहिती विचारल्याने दुसरीला मारहाण

पहिल्या लग्नाची माहिती विचारल्याने दुसरीला मारहाण

प्रातिनिधीक फोटो

पतीचे पहिले लग्न झाल्याची माहिती पत्नीला समजली असता पत्नीने पतीकडे पहिल्या लग्नाची विचारणा केली. त्याचा राग अनावर झाल्याने पतीने पत्नीला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. ही घटना नांदुरगावातील जनार्दन स्वामीनगर येथे घडली. याप्रकरणी अनम अदिल शेख यांनी आडगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अदिल अकबर शेख (रा.नांदुरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अदिल शेख व अनम शेख हे पती-पत्नी आहेत. अदिल शेखचे पुर्वी पहिले लग्न झाल्याचे अनम शेख यांना समजले. पती घरी आल्यावर अनम यांनी पहिल्या लग्नाची माहिती मला सांगितली नाही, असे विचारले. त्याचा राग अनावर झाल्याने पतीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार पगार करीत आहेत.

First Published on: May 20, 2019 12:40 AM
Exit mobile version