मद्यविक्रीच्या दुकानांना देव-देवतांचे नावे न देण्याच्या शासननिर्णयाची अंमलबजावणी सुरू

मद्यविक्रीच्या दुकानांना देव-देवतांचे नावे न देण्याच्या शासननिर्णयाची अंमलबजावणी सुरू

नाशिक : राज्यातील मद्यविक्रीच्या दुकानांना देव, देवता, धार्मिक, महापुरुष तसेच गडकिल्ल्याचे नाव देता येणार नाही असा निर्णय राज्य सरकारने एप्रिल महिन्यात घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. मद्यविक्रीच्या अस्थापनांना देव-देवता, धार्मिक श्रद्धास्थानांची तसेच राष्ट्रपुरुष, महापुरुष, गडकिल्ले यांची नावे दिलेली असल्याने अनेकदा त्यातून भावना दुखावल्या जात होते. त्यासंदर्भात अनेक वर्षांपासून अशी नावं बदलावी ही मागणी केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला होता.

दरम्यान नाशिक जिल्ह्यात याबाबत अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी याबाबत आदेश काढले आहे. तसेच १ जुलै पर्यंत याबाबत कारवाई पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.

First Published on: June 17, 2022 8:33 PM
Exit mobile version