CORONA VIRUS: देवळा तालुक्यात आज पुन्हा ६ अहवाल पॉझिटिव्ह

CORONA VIRUS: देवळा तालुक्यात आज पुन्हा ६ अहवाल पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरस

देवळा येथील तालुका प्रशासनाला (दि. १६) सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालात आणखी सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

आज १६ सप्टेंबर रोजी प्राप्त ११३ रिपोर्ट मध्ये ६ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून उर्वरित १०७ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, पॉझिटिव्ह ६ रिपोर्ट सविस्तर माहिती पुढील प्रमाणे:-
देवळा शहर एक ३१ वर्षीय महिला, मेशी दोन त्यात ३४ वर्षीय महिला व ८ वर्षीय बालिका, चिंचवे ३९ वर्षीय महिला, उमराणा येथील २ त्यात १८ वर्षीय पुरुष व ३० वर्षीय महिला अशा ६ जणांचा समावेश आहे.

त्यामुळे जनतेत चिंता व्यक्त करण्यात येत आहे, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः हुन तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे. तसेच परिसरात अजून रुग्ण वाढू शकत असल्याने जनतेने घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्यधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले आहे.

First Published on: September 16, 2020 1:47 PM
Exit mobile version