उत्तर महाराष्ट्रात ‘आयकर’चे छापे; १८० कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली

उत्तर महाराष्ट्रात ‘आयकर’चे छापे; १८० कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली

नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात आयकर विभागाचे छापासत्र सुरू असून, या तिन्ही जिल्ह्यांत टाकलेल्या छाप्यात १८० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. यात डॉक्टर, पॅथॉलॉजी लॅबसह एका खासगी साखर कारखान्यावरही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून आयकर विभागाच्या वतीने ही कारवाई सुरू आहे.

गेल्या आठवड्यात या कारवाईला सुरुवात झाली आहे. यामध्ये सुमारे ३० डॉक्टरांवर विविध ५० ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. कट प्रॅक्टिसचा गोरखधंदा या मुळ संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे. केवळ डॉक्टरांच्याच नाही, तर निफाड तालुक्यातील एका खासगी साखर कारखान्यावरही छापा टाकण्यात आला आहे. कारवाईत बेहिशेबी रोख रूक्कम, दागिने, कागदपत्रे आणि मिळकती मिळून आल्या आहेत. त्यांची छाननी सुरू आहे. जवळपास १८० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्तेवर कारवाई करण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या नोंदीही संशयास्पद आहेत. छाप्यानंतर अनेकांना कारणे दाखवा नोटिसदेखील पाठवण्यात येणार आहे.

First Published on: February 25, 2019 10:07 PM
Exit mobile version