इंडिगोची नाशिक-दिल्ली सेवा २५ सप्टेंबर पासून

इंडिगोची नाशिक-दिल्ली सेवा २५ सप्टेंबर पासून

इंडिगो एअरलाईन्स

नाशिक – दिल्ली विमानसेवा देण्यास इंडीगो कंपनीने तयारी दर्शवली आहे. या संदर्भात इंडिगोने नागरी उड्डयन मंत्रालयासोबत पत्रव्यवहार करत आज दि. २५जुलै रोजी सेवेला मंत्रालयाने परवानगी मिळविली आहे. दिनांक २५ सप्टेंबर पासून हि सेवा इंडिगो A ३२० या विमानाने सुरु होणार आहे. ओझर विमानतळाहून उडाण योजनेंतर्गत नाशिक- अहमदाबाद आणि हैदराबादसाठी सेवा दिली जात आहे. उडाण अंतर्गत नाशिक देशातील प्रमुख बारा शहरांशी जोडले जाणार आहे. आता तर ओझर विमानतळावर नाइट लँण्डिंगला परवानगी देण्यात आल्याने स्पाइस जेटमार्फत नाशिक- गोवा सेवा दृष्टीपथात आहे.

हि विमानसेवा दिल्ली विमानतळावरून रोज दुपारी १२:१०वा निघून नाशिक येथे दुपारी ०२:१० येथे पोहचेल; तसेच नाशिक येथून दुपारी ०२:४५ वा निघून दुपारी ०४:३५वा पोहचणार आहे.

रोज असणाऱ्या सेवेमुळे नाशिक-दिल्ली व्यापाराला चालना मिळणार आहे तसेच पर्यटनाच्या दृष्टिने नाशिक हे डेस्टिनेशन असल्याने दिल्लीहुन पर्यटक देखील येथे मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. यापूर्वी नाशिक-दिल्ली कार्गो सेवेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता.

तिकीट दर अधिक राहण्याची शक्यता

जेट एअरवेज मार्फत उडाण योजनेंतर्गत तिकिट दरात सवलत देण्यात येत होती मात्र इंडीगोची सेवा उडाणमध्ये समाविष्ट नसल्याने तिकिट दर अधिक राहणार आहेत. यापूर्वी नाशिककर शिर्डीहून दिल्ली गाठत होते अर्थात शिर्डी येथील सेवाही उडाणअंतर्गत येत नसल्याने नाशिकहूनही तेच दर असतील असा अंदाज आहे.

First Published on: July 25, 2019 7:41 PM
Exit mobile version