मागील दोनही निवडणुकांत पोल ‘तोंडघशी’

मागील दोनही निवडणुकांत पोल ‘तोंडघशी’

प्रत्येक निवडणुकीत निकाल जाहीर होण्यापूर्वी एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले जातात. संशोधन संस्था आणि माध्यम संस्था आपापले एक्झिट पोल जाहीर करतात आणि निकालानंतर आपापले अनुमान कसे मिळते-जुळते आहेत हे सांगण्यात व्यस्त होतात. मागच्या दोन लोकसभा निवडणुकांचा विचार करता एक्झिट पोलचे आकडे चुकीचे आणि भंपक असल्याचे सिध्द झाले. तरीही, त्याच थाटात यंदाही लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत.

मतदान केल्यानंतर काही वेळातच संबंधित प्रतिनिधी मतदाराला कुणाला मत दिले विचारतात. मतदानाच्या दिवशी असंख्य लोकांशी अशा प्रकारचे प्रश्न विचारुन कोणता पक्ष आणि उमेदवार जिंकणार आहे याचा अंदाज लावला जातो. माध्यम संस्था, व्यावसायिक संस्थांकडून अशा प्रकारचे एक्झिट पोल करुन घेतात. निवडणुकीचा ट्रेंड काय आहे हे समजण्यासाठी एक्झिट पोल घेतले जातात. मात्र प्रत्येक निवडणुकीत जाहीर होणार्‍या एक्झिट पोल्सपैकी ९० टक्के अंदाज चुकीचेच ठरतात. अनेकदा पोलच्या विश्वसनीयतेवरच शंका उपस्थित केली जाते. २००९च्या लोकसभा निवडणुकीत सीएनएन-आईबीएन आणि दैनिक भास्करने आपल्या एक्झिट पोलमध्ये यूपीएला १८५ ते २०५ पर्यंत, एनडीएला १६५ ते १८५, तिसर्‍या आघाडीला ११० ते १३० आणि चौथ्या आघाडीला २५ ते ३५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. तसेच स्टार नीलसनच्या एक्जिट पोलमध्ये यूपीएला १९९, एनडीएला १९६, तिसर्‍या आघाडीला १०० आणि चौथ्या आघाडीला ३६ जागा मिळतील, असे म्हटले होते. याच पध्दतीने इंडिया टीव्ही- सी वोटरनी आपल्या पोलमध्ये यूपीएला १८९ ते २०१, एनडीएला १८३ ते १९५ आणि तिसर्‍या आघाडीला १०५ ते १२१ जागा दर्शविल्या होत्या. म्हणजेच कोणत्याही एग्जिट पोलमध्ये यूपीएला बहुमताच्या जवळपास दाखवले नव्हते. मात्र, निकालानंतर सर्वच एक्जिट पोलचे निकाल चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. २००९ मध्ये यूपीएला २६२, एनडीएला १५९ आणि तिसर्‍या आघाडीला ७९ जागा मिळाल्या. म्हणजेच सर्वच एक्झिट पोल वास्तविक आकड्यांपासून दूर राहिले.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सीएनएन-आईबीएन आणि सीएसडीएस लोकनिती के एक्झिट पोलमध्ये एनडीएला २७६, यूपीएला ९७ आणि १४८ अन्य जागा दाखवण्याचा अंदाज लावण्यात आला होता. याच पध्दतीने इंडिया टूडेच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २७२, यूपीएला ११५ आणि तिसर्‍या आघाडीला १५६ जागा मिळतील असे म्हटले होते. त्याचवेळी टाइम्स नाऊ- ओआरजीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २४९, यूपीएला १४८ आणि १४६ अन्य जागा दाखविण्यात आल्या होत्या. एबीपी न्यूज- नीलसनने आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २७४, यूपीएला ९७ आणि १६५ अन्य जागा दाखवल्या होत्या. इंडिया टीवी- सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २८९, यूपीएला १०१ आणि १४८ अन्य जागा दाखवण्यात आल्या होत्या. त्याचवेळी एनडीटीव्ही- हंसा रिसर्चच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २७९, यूपीएला १०३ आणि १६१ अन्य जागा दाखवण्यात आल्या होत्या. बरोबरच न्यूज २४- चाणक्यने एनडीएला ३४०, यूपीएला ७० आणि १३३ अन्य जागा मिळतील असा अंदाज लावला होता. या सर्व एक्झिट पोलने एनडीएला बहुमतापासून दूर ठेवले. जवळपास निम्म्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळण्याचा दावा केला. जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा बहुतांश एक्जिट पोल चुकीचे सिध्द झाले. या निवडणुकीत एनडीएने ३३६, यूपीएने ५८ आणि १४९ अन्य जागा मिळाल्या. २०१४ मध्ये केवळ चाणक्यच्या एक्झिट पोलचा आकडा हा वास्तविक निवडणुकीच्या निकालाजवळ पोहचला. अन्य सर्वच एक्झिट पोलने एनडीएला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाजच वर्तवला नव्हता.

एक्जिट पोलचा असा आहे इतिहास

भारतात एक्झिट पोलचे खाते सेंटर फॉर स्टडी ऑफ डेवलपिंग सोसायटी (सीएसडीएस)ने १९६० मध्ये खोलले होते. अर्थात माध्यमांमध्ये १९८० मध्ये पहिले पोल सर्वेक्षण झाले. त्यावेळी प्रसिध्द पत्रकार प्रणव रॉय यांनी मतदारांचा कौल तपासण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याबरोबर निवडणूक तज्ज्ञ डेविड बटलर हे देखील होते. दूरदर्शनने सीएसडीएस बरोबर १९९६ मध्ये एक्झिट पोल सुरु केला. १९९८ च्या निवडणुकीत जवळपास सर्वच वाहिन्यांनी एक्झिट पोल केले होते. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम २६ नुसार मतदानापूर्वी एक्झिट पोल सार्वजनिक करण्याची अनुमती नाही. शेवटच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या अर्धा तासानंतर एक्झिट पोल दाखवता येतात. हे बंधन प्रकाशन संस्था आणि प्रसारण संस्था या दोघांवर आहे.

First Published on: May 20, 2019 9:12 PM
Exit mobile version