स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी जामले पाळे ग्रामस्थांचा मोर्चा

स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी जामले पाळे ग्रामस्थांचा मोर्चा

जामले पाळे व बालापूर या दोन्ही गावातील नागरिकांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

ग्रामविकासाच्या अनेक योजना राबवताना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यात अडचणी येत असल्याने व विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने त्रस्त तालुक्यातील जामले पाळे व बालापूर या दोन्ही गावातील नागरिकांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार बंडू कापसे व गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांना निवेदन दिले.

गोपाळखडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जामले पाळे व बालापूर या दोन्ही गावांना विकासकामांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. ग्रुप ग्रामपंचायतीच्या कारभाराला दोन्ही गावातील जनता त्रस्त झाली आहे. राजकीय हेवेदावे व ग्रामसेवकांच्या एककलमी कामकाजामुळे विकासकामे खोळंबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या दोन्ही गावांची स्वतंत्र ग्रामपंचायत करावी अशी मागणी जामले पाळे व बालापूर या दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे. यावेळी भारत चौरे, विजय पालवी, पुंडलिक साबळे, नानाजी पवार, नामदेव पवार आदींसह जामले पाळे व बालापूरचे नागरिक उपस्थित होते. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

First Published on: June 27, 2019 8:59 AM
Exit mobile version