जेईई, ‘नीट’चे विद्यार्थी अडकले ‘कोटा’ शहरात

जेईई, ‘नीट’चे विद्यार्थी अडकले ‘कोटा’ शहरात

नाशिक : वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या नीट, जेईई या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी कोटा (राजस्थान) शहरात गेलेले नाशिकचे शेकडो विद्यार्थी येथे अडकले आहेत. ‘कोटा’मध्ये त्यांना जेवनही वेळेवर मिळत नसून हॉस्टेलमध्ये राहुन उदासीनता वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. या विद्यार्थ्यांचे पालक आता लॉकडाऊन संपण्याची वाट बघत असून, लॉकडाऊन वाढल्यास जिल्हा प्रशासनाकडे ते मुलांना सोडण्याची विनंती करणार आहेत. एप्रिल महिन्यात जॉईन एन्ट्रान्स एक्झाम (जेईई) ही परीक्षा घेण्यात येणार होती. तसेच एमबीबीएस, बीडीएस यांसारख्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणार्‍या ‘नीट’ परीक्षेचे मे महिन्यात नियोजन केले होते. या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी राजस्थानमधील ‘कोटा’ पॅटर्न खूपच लोकप्रिय आहे. त्यासाठी दोन महिन्यांपासून नाशिकचे सुमारे 650 विद्यार्थी कोटामध्ये गेले आहेत. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महिन्यापूर्वी लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले असून, शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेसही लॉकडाऊन झाले. विद्यार्थी आहे त्याच ठिकाणी मुक्कामी राहिले आहेत. त्यांना आता व्यवस्थित जेवनही मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. करिअर घडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे करिअरच लॉकडाऊन झाल्याची भावना पालक आता व्यक्त करत आहेत.

नाशिकचे अनेक विद्यार्थी सध्या कोटा शहरात अडकले आहेत. यात माझ्या मुलाचाही समावेश असून त्याने माझ्याशी संपर्क करुन नाशिकमध्ये येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. ‘कोटा’ शहरातील अडचणी वाढत असल्याचे त्याने सांगितले. त्यादृष्टीने आम्ही जिल्हा प्रशासनाकडे विनंती करणार आहोत.
-डॉ.कपिल खैरनार, पालक

First Published on: April 27, 2020 7:38 PM
Exit mobile version