कनिष्ठ लिपिकास लाच घेताना अटक

कनिष्ठ लिपिकास लाच घेताना अटक

एकत्रित कुटुंबातील ७/१२ उतार्‍यावर वारस नावे लावण्याचा निकाल देण्यासाठी एक लाख १५ हजारांची लाच मागणार्‍या अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीकास लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी सोमवारी (ता. २०) लाच घेताना रंगेहात पकडले.

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील निवाणे येथील गट नंबर ६७ वरील एकत्र कुटूंबातील वारस नावांच्या सुनावणीची प्रक्रिया मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. यासंदर्भात या कार्यालयातील लिपीक विशाल बबन लोहार व खासगी इमम नाना जाधव (रा. मालेगाव कॅम्प) यांनी तक्रारदारास गेल्या सोमवारी (ता. १३) दुपारी ४.४० वाजता मोबाईलवरून संपर्क केला. त्यात निकाल देण्यासाठी तक्रारदारकडे १ लाख १५ हजारांची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधत तक्रार केली. यानुसार लाचलुचपत विभागाने यासंदर्भात पडताळणी करून अपर जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचत विशाल बबन लोहार याला २५ हजार रुपयांची रोख रकमेची लाच घेताना ताब्यात घेतले.

First Published on: May 21, 2019 7:16 AM
Exit mobile version