कोपरगावकरांना एका क्लिकवर आरोग्याची माहिती

कोपरगावकरांना एका क्लिकवर आरोग्याची माहिती

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बाधित झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना उपचाराच्या दृष्टीने अनेक गोष्टींची माहिती मिळविण्यासाठी विविध हॉस्पिटलशी संपर्क करावा लागत होता. एकीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेले रुग्ण त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा वाढलेला ताण अशा परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कोरोनाबाधित रुग्णांना बाधा झाल्यांनतर योग्य मार्गदर्शन, सुविधा व औषधोपचार मिळाल्यास तो रुग्ण निश्चितपणे बरा होतो. त्यासाठी वेळेत योग्य माहिती उपलब्ध असणे गरजेचे असून, अशा प्रकारच्या जीवघेण्या संकटात आरोग्यविषयक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असून भविष्यात हॉस्पिटल ओम अ‍ॅप महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

कोपरगावमध्ये प्रथमच एमएच ३५७ या कंपनीची स्थापना करून तालुक्यातील नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधांची उपलब्धता या विषयी सखोल माहिती देणार्‍या हॉस्पिटल ओम या अ‍ॅपचा शुभारंभ नुकताच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. अ‍ॅपच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व हॉस्पिटल्सविषयी सर्व माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. अ‍ॅपचे निर्माते प्रीतम महावीर संघवी यांनी महाराष्ट्रातील ३५७ तालुक्यांसाठी हे अ‍ॅप सुरू करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या कामासाठी आमदार काळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी धरमशेठ बागरेचा, सुनील गंगूले, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार, डॉ. भरत संघवी, डॉ. विजय संघवी, डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. राजेंद्र चीने, डॉ. योगेश कोठारी, डॉ. मयूर जोर्वेकर, डॉ. मयूर तिरमखे, डॉ. आतिष काळे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. सुनील लोढा आदी उपस्थित होते.

First Published on: June 25, 2021 11:30 AM
Exit mobile version