वेदांता अव्हेन्यू गृहप्रकल्पाचं शनिवारी लाँचिंग

वेदांता अव्हेन्यू गृहप्रकल्पाचं शनिवारी लाँचिंग

नाशिकमधील वेदांता अव्हेन्यू गृहप्रकल्प

त्र्यंबकरोडपासून हाकेच्या अंतरावर, खुटवडनगरालगत रवी-आकार ग्रुपच्या वतीने उभारल्या जात असलेल्या वेदांता अव्हेन्यू या भव्य गृहप्रकल्पाचे शनिवारी (दि. ७) अत्यंत दिमाखात लाँचिंग होणार आहे. या प्रकल्पाची खासियत म्हणजे ग्राहकांना पझेशन मिळेपर्यंत कोणताही ईएमआय भरावा लागणार नाही, शिवाय अत्यंत माफक दरांत उच्च दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत.

गंगापूररोडसारख्या अॅमेनिटिज आणि त्याही मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये देणारा हा प्रकल्प खुटवडनगरातील सीटू भवनासमोर साकारला जातो आहे. त्रिमूर्ती चौकापासून अगदी जवळ असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून 1, 2 आणि 3 बीएचके फ्लॅट्सचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत. खुटवडनगरातील एक एकर जागेत उभा राहणारा हा या भागातील पहिलाच भव्य प्रकल्प असल्याची माहिती ग्रुपचे संचालक समीर पाटील यांनी दिली.

सातपूर आयटीआय, उद्योग भवन, पीएफ ऑफिस, निमा हाऊस, त्रिमूर्ती चौक आणि त्र्यंबकरोडपासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पात ११ शॉप्स आणि ११२ रेसिडेन्शियल फ्लॅट्स आहेत. त्यामुळे व्यावसायिक, नोकरदार आणि कामगारांसाठी हा प्रकल्प त्यांची स्वप्नपूर्ती करणारा आहे. सोलार नेट मीटरिंग, जीम, गार्डन, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र जागा, चिल्ड्रन प्ले एरिया, टेबल टेनिस, पार्टी हॉल, आकर्षक लॉबी, सीसीटीव्ही, सिक्युरिटी केबिन अशा कितीतरी अॅमेनिटिज् या प्रकल्पात उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे ग्रुपचे संचालक रवींद्र पाटील यांनी सांगितले. सामान्यांचं स्वप्न साकारणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात ग्राहकांना आनंददायी जीवनशैली अनुभवता येणार आहे. प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खुटवडनगरातील दरांपेक्षाही कमी किंमतीत या प्रकल्पात नागरिकांना घर घेता येणार असल्याने, या प्रकल्पाला एकदा आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन ग्रुपचे संचालक रंजन पाटील यांनी केले आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

प्रकल्पात मिळणाऱ्या अॅमेनिटिज्

प्रकल्पाची माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क – 8743965965

First Published on: November 6, 2020 9:53 PM
Exit mobile version