इंदिरानगरमध्ये बिबट्याचा दोघांवर हल्ला

इंदिरानगरमध्ये बिबट्याचा दोघांवर हल्ला

इंदिरानगरमध्ये बिबट्याचा दोघांवर हल्ला

इंदिरानगर परिसरातील राजसारथी गृहनिर्माण सोसायटी परिसरात शनिवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास बिबट्याने शिरकाव दोघांवर हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याचा शोध सुरू केला. बिबट्या आल्याची माहिती समजताच नागरिकांमध्ये मात्र चांगलीच धास्ती निर्माण झाली होती.

इंदिरानगरमधील राजसारथी सोसायटीतील बी-१२ मध्ये बिबट्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आला. या सोसायटीतील बिबट्याने दोन जणांना जखमी केले. इंदिरानगर परिसरात बिबट्या आल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांना मिळताच ते पोलीस कर्मचारी व वनविभागाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्याला पकडण्यासाठी धावपळ सुरु झाली. परिसरात पथकास बिबट्याच्या पाऊलखुणा दिसून आल्या आहेत. दरम्यान, जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First Published on: May 30, 2020 7:58 AM
Exit mobile version