नाशिकरोडला बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

नाशिकरोडला बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

चाडेगाव येथे दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद केल्यानंतर बुधवारी (दि.२४) पहाटे पळसे शिवारातील रामदास खंडू गायधनी यांच्या गट क्रमांक ४४० मधील मळ्यात बांधलेली गाय बिबट्याने फस्त केली. या परिसरातही बिबट्यांची संख्या जास्त असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी वनविभागाला माहिती दिली, यावेळी पंचनामा करण्यात आला.

First Published on: July 24, 2019 7:57 PM
Exit mobile version