लॉकडाऊन संपताच शेतकर्‍यांना पीककर्ज

लॉकडाऊन संपताच शेतकर्‍यांना पीककर्ज

नाशिक : देशभरातील लॉकडाऊन संपताच जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करुन देण्याचे नियोजन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी सुरु केले आहे. शेतकर्‍यांना प्रतिक्षा लागून असलेल्या कर्जमाफीची यादी ‘लॉकडाऊन’ झाली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर कर्जदारांच्या संख्येत वाढ होऊ शकते. शेतकर्‍यांना कर्जमाफीची रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा झालेली नसताना, बँकेने शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून पीककर्ज वाटपास प्रांरभ झाला आहे. बँकेच्या कर्ज धोरणानुसार पीक कर्ज वितरणाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी विविध कार्यकारी सोसायट्यांनी कमाल मर्यादा पत्रक, नुतनीकरण करून त्यांची बॅक निरीक्षकांनी छाननी करून विभागीय अधिकार्‍यांमार्फत केंद्र कार्यालयास शिफारस करावी लागते. याकरिता ३१ मार्च २०२० ही मुदत देण्यात आली होती. परंतू ही मुदतही ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. हे काम करत असताना पीक कर्ज देण्याची कार्यवाही मात्र सुरूच ठेवण्याचे आदेश बँक प्रशासनाने दिले आहेत.

First Published on: April 3, 2020 7:01 PM
Exit mobile version