असे झाले पुरामुळे नुकसान

असे झाले पुरामुळे नुकसान

गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर नदीवरील पूल, पात्रांच्या संरक्षक जाळ्या आणि गोदापार्कलगत करण्यात आलेल्या सुशोभिकरण कामाचे झालेले नुकसान उघड झाले आहे. पुलांवरचे पथदीप आणि संरक्षक कठडे वाहून गेलेले आहे.
गोदावरीच्या पुरात शहीद अरुण चित्ते पूल, शासकीय रोपवाटीका पूल, रामवाडीचा पूल, रामशेतू, दहीपूल, टाळकुटेश्वर पूल, तपोवनातील जनार्दन स्वामी पूल, टाकळी येथील पूल, दसक-पंचक येथील पूल पाण्याखाली गेलेले होते. या पुलावर असलेले पथदीप पाण्याच्या प्रवाहाने वाकले आहे. तर काही पाण्यात वाहून गेले आहेत. वीज वाहक केबल पाण्यात उखडून पाण्यात तरंगत होत्या.

त्याचबरोबर पुलांचे संरक्षक कथडे तुटून गेल्याने त्यांचे लोखंडी पाईपही पुराबरोबर वाहून गेलेले होते. तसेच पुराबरोबर नदीपात्रात उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीच्या जाळी आणि कथडेही वाहून गेलेले होते. तसेच काही ठिकाणी गैबलियन पद्धतीच्या संरक्षक भिंतीही नदीपात्रात पुराने ओढल्या गेलेल्या होत्या.

First Published on: August 6, 2019 8:41 PM
Exit mobile version