गणिततज्ज्ञ शिक्षक दिलीप गोटखिंडीकर यांचे निधन

गणिततज्ज्ञ शिक्षक दिलीप गोटखिंडीकर यांचे निधन

नाशिक । गणिततज्ज्ञ शिक्षक दिलीप गोटखिंडीकर यांचे आज पहाटे साडेसहा वाजता निधन झाले. विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी याकरीता अतिशय सोप्या भाषेत ते गणित समजून सांगत गणित विषयांसदर्भात त्यांची चाळीसहून अधिक पुस्तक प्रकाशित केली. पेठे विद्यालयात त्यांनी अनेक वर्ष अध्यापनाचे काम केले. चाळीसगाव जवळील पाठमादेवी येथे होउ घातलेल्या गणित नगरीची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सरकारने दिली होती. मंगळवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने गणित क्षेत्रातील एक अनमोल रत्न हरपले.

आंतरराष्ट्रीय गणिततज्ञ दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे दुःखद निधन झाले. नाशिकच्या पेठे विद्यालयात नोकरी करत असतांना त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. गणित विषयातील तज्ञ गोटखिंडीकर यांनी भास्कराचार्य गणित नगरी उभारणीमध्ये महत्वाची जबाबदारी पार पडली. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले. आजवर त्यांची ७३ पुस्तके देखील प्रकाशित झाली आहे. मी व माझे कुटुंबीय गोटखिंडीकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून राज्य शासनाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
छगन भुजबळ,
पालकमंत्री, नाशिक

First Published on: December 29, 2020 12:24 PM
Exit mobile version