नाशिककरांनी अनुभवली मिसळ पार्टीची धमाल

नाशिककरांनी अनुभवली मिसळ पार्टीची धमाल

मिसळ पार्टीला नाशिककर अशा आकर्षक, रुबाबदार पारंपरिक पेहरावात सहभागी झालेले होते.

अस्सल महाराष्ट्रीयन पेहरावात झालेलं आगमन, विविध उपक्रमांमधील उत्स्फूर्त सहभाग, मोठ्यांची आनंद आणि बच्चे कंपनीची धमाल, कॅमेराबंद केले जाणारे हे उत्सवी क्षण आणि तर्रीदार मिसळ-पावच्या बेतावर मारलेला ताव… अशा उत्साहपूर्ण वातावरण नाशिककरांनी अनुभवले. विविध उपक्रमांतील विजेत्यांच्या गौरवाने या संपूर्ण कार्यक्रमाला चार चाँद लावले.

आपलं महानगर आणि पाटील वाडा यांच्या वतीने महाराष्ट्र दिनी आयोजित मिसळ पार्टीत नाशिककर खवय्यांनी मिसळच्या मेजवाणीवर ताव मारतानाच विविध उपक्रमांची धमाल अनुभवली. मोतीवाला कॉलेज परिसरातील पाटील वाडा या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र दिनी मराठी संस्कृतीचा आदर राखला जावा आणि नाशिककर वाचकांना सहकुटूंब आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, हा या कार्यक्रमामागील हेतू होता.

या कार्यक्रमाची सुरुवात विविध धमाल स्पर्धांनी झाली. त्यालाही सहभागी वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर नाशिककरांनी तर्रीदार मिसळ-पावच्या बेतावर मनसोक्त ताव मारला. कार्यक्रमाची सांगतादेखील संस्मरणीय ठरली. यात पाटील वाडाचे अप्पासाहेब पाटील ब्रिजमोहन टुरिझमचे ब्रिजमोहन चौधरी, आंचल सारीजचे संज्योग कासलीवाल, आपलं महानगरचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे, श्रीकांत खंदारे, प्राची जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमातील सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि सर्वोत्कृष्ट दांपत्यांसह स्पर्धांमधील विजेत्यांना गौरविण्यात आले.

First Published on: May 1, 2019 12:55 PM
Exit mobile version