आमदार सरोज आहिरे यांचे २१ फेब्रुवारीला शुभमंगल

आमदार सरोज आहिरे यांचे २१ फेब्रुवारीला शुभमंगल

श्रीधर गायधनी
देवळालीच्या आमदार कुमारी सरोज आहिरे लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचे समजते. नाशिकरोडच्या डाॅक्टर प्रवीण वाघ यांच्यासोबत विवाह निश्चित झाला असून २१ फेब्रुवारी रोजी दुपारी चांदशी शिवारातील एका लाॅन्स वर मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

आमदार सरोज आहिरे या महानगर पालिकेत भाजपाच्या नगरसेवक होत्या त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केल्यानंतर नगरसेवक पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काॅंग्रेस मध्ये प्रवेश करत तिकीट मिळविले होते, देवळाली मतदार संघात प्रचंड जनसंपर्क असल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मोठा विजय मिळवला होता, त्यानंतर कोविड काळातही मोठे काम केले होते, त्याच प्रमाणे मतदार संघातील गावांतील शेतजमिनींवर बालाजी ट्रस्टची नावे कमी करणे, एकलहरे व नासाका प्रकल्पांसाठी मोठे प्रयत्न केलेले पहायला मिळाले, येत्या २१ तारखेला होत असलेल्या आमदार आहिरे यांच्या शुभमंगल सोहळ्याची वार्ता देवळालीसह जिल्ह्यात व राज्यात कुतूहलाचा विषय बनला आहे, आमदर अहिरेंच्या समर्थकांसह, विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. डाॅ. प्रवीण वाघ हे नाशिकरोड येथील असून त्यांचे सौभाग्य नगर भागात रुग्णालय असल्याचे समजते. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता आमदार यांच्या कार्यालयातूनही विवाह सोहळ्याची माहिती खरी असल्याचे सांगितले.

First Published on: February 5, 2021 3:50 PM
Exit mobile version