राज ठाकरेंना मास्कचे वावडे, नाशकातही विनामास्क एन्ट्री

राज ठाकरेंना मास्कचे वावडे, नाशकातही विनामास्क एन्ट्री

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मास्कचे वावडे आहे हे आतापर्यंत सगळ्यानांच कळाले आहे. पण सध्या राज्यात पुन्हा कोरोनाने डोके काढले असतानाही राज मात्र सार्वजनिक ठिकाणीही विनामास्क फिरत आहेत. एवढेच नाही तर आज नाशकात त्यांनी माजी महापौरांनाही मास्क काढायला लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (MNS Chief Raj Thackeray in Nashik)

वर्ष उलटलं तरी कोरोना काही जगाची पाठ सोडत नाहीये. उलट नवीन वर्षात वाढणारी रुग्णसंख्या बघून कोरोनाचा पुन्हा उद्रेक होतोय की काय अशी धास्ती तज्त्र व्यक्त करत आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. पण राज ठाकरे सरकारच्या या सूचनांना केराची टोपली दाखवत असून काही दिवसांपूर्वीही मुंबईत मराठी दिनाच्या दिवशी २७ फेब्रुवारीला ते विनामास्क दिसले होते. आज राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. पण तिथेही ते विनामास्क दिसले. यावेळी माजी महापौर अशोक मुर्तडकर यांनी डबल मास्क घालून त्यांचे स्वागत केले. यावर राज यांनी मास्कवर मास्क लावलाय का असा प्रश्न विचारला. राज यांच्या या प्रश्नामुळे महापौर ओशाळले व त्यांनी मास्क काढला.

एकीकडे मुंबई पुण्यासह नाशकातही कोरोनारुग्ण वाढत आहेत. यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड ठोठावला जात आहे. पण राज यांच्या या विनामास्क स्वॅगवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

 

First Published on: March 5, 2021 12:51 PM
Exit mobile version