मान्सून दाखल; खरीपाच्या कामांना वेग

मान्सून दाखल; खरीपाच्या कामांना वेग

इगतपुरी तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाचे योग्य वेळेवर आगमन झाल्यामुळे खरीपाच्या तयारीला वेग आला असून शेतकरी वर्गाने भात पेरणीच्या कामांना वेग घेतला आहे. भात लागवडीत अग्रेसर असणार्‍या इगतपुरी तालुक्यात यंदा 32 हजार 237 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ठ्य ठेवण्यात आले असून, चालू हंगामात तालुक्यात 27 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे.

तालुक्यात 126 महसूली गावे व वाड्यांमधील शेतकरी भात, वरई, नागली, सोयाबीन, खुरसणी, मका व इतर पिके घेतात खरीप हंगामात इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ, सोनम, गरी, हाळी, कोळपी या जातीचे भात पिके घेण्यास प्राधान्य देतात. तालुक्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 23 हजार 332 हेक्टर असुन यंदाच्या खरीप पेरणीचे उद्दिष्ठ्य 32 हजार 830 हेक्टर असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. मागील वर्षी 27 हजार 831 हेक्टरचे उद्दिष्ठ्य होते. गेल्या हंगामात एकत्रित 2730 मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली होती

इगतपुरी तालुका हा भात पिकासाठी प्रसिद्ध म्हणून ओळखला जातो. पोषक असे वातावरण असलेल्या व पावसाचे माहेर घर समजल्या जाणार्‍या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी, गरी कोळपी, १००८, वायएसआर, हळे, पूनम, डी १००, ओम 3, सेंच्युरी, ओम श्रीराम 125, रुपाली, रुपम, विजय, आवणी, लक्षमी, खुशबू, सोनम, दप्तरी १००८, वर्षा, राजेंद्र, बासमती आदी प्रमुख भात जाती या तालुक्यात घेतल्या जातात.

भात शेतीचा वाढता खर्च बघितला तर ते देखील करणे मुश्किल होत आहे. खतांच्या वाढणार्‍या किमती, बी बियाणे, औषधे हे वापरून शेतकरी मेटाकुटीस आला असून, खतांच्या किंमतीत दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढ होत आहे, तर भाताला दरवर्षी भाव आहे तोच राहतो. दरम्यान गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

खरीपाचे नियोजन, उद्दिष्ट्य हेक्टर क्षेत्र

First Published on: June 9, 2021 6:10 PM
Exit mobile version