नाशिकमध्ये शंभरी पार केलेले ३ हजार मतदार!

नाशिकमध्ये शंभरी पार केलेले ३ हजार मतदार!

वोटिंग

निवडणूक आयोगाने यंदा युवा मतदारावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूक आयोगाच्या आढावा बैठकित वयाची शंभरी पार केलेल्या मतदारांचा मुददाही चर्चेत आला असता अशा मतदारांची तालुकानिहाय यादी तयार करून त्यांची पडताळणी करण्याचे निर्देश आयोगाने दिले असून त्यानुसार जिल्हयात वयाची शंभरी पार केलेली ३००८ मतदार आढळून आली आहेत.

घरोघरी जाऊन केली पडताळणी

११ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नुकताच निवडणूक तयारीचा आयोगाचे मुख्य अधिकारी अश्वनीकुमार यांनी आढावा घेतला असता यात शंभर वय असलेल्या व शंभरी पार केलेल्या मतदारांवर विशेष फोकस करण्यात आला. अनेकवेळा असे मतदार अस्तित्वात नसतांनाही त्यांच्या नावे बोगस मतदान होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तर अनेकवेळा कुटुंबियांकडून अशा मतदारांची नावे कमी केले जात नाही. त्यामुळे जिल्हयातील अशा मतदारांची तालुकानिहाय माहीती संकलित करून पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हयात १२०० बीएलओंमार्फत या मतदारांची घरोघरी जाउन पडताळणी करण्यात येत आहे. अस्तित्वात नसलेल्या मतदारांचे नाव कमी करण्यासाठीचा अर्जही संबधितांच्या कुटुंबियांकडून भरून घेण्यात येत आहे. यासंदर्भातला अहवाल येत्या दोन दिवसात सादर करण्याचे निर्देशही निवडणूक शाखेने दिले आहेत.

मतदारांची संख्या

मालेगाव मध्य – २९६ मतदार
मालेगाव बाहय – २५८ मतदार
नाशिक मध्य – २७९ मतदार
नाशिक पूर्व – २६६ मतदार
नाशिक पश्चिम – १९७ मतदार
नांदगाव – २४० मतदार
येवला – २३१ मतदार
सिन्नर – २०६ मतदार
बागलाण – १८५ मतदार
देवळाली – १७७ मतदार
चांदवड – १७२ मतदार
निफाड – १५० मतदार
कळवण – १३१ मतदार
दिंडोरी – ११२ मतदार
इगतपुरी – १०८ मतदार

First Published on: January 4, 2019 7:48 AM
Exit mobile version