जुन्या नाशकात पोलिसांसह शीघ्र कृती दलाच्या जवानांचे संचलन

जुन्या नाशकात पोलिसांसह शीघ्र कृती दलाच्या जवानांचे संचलन

करोना पार्श्वभूमीवर व रमजान पर्वातील ‘शब-ए-कद्र’ची रात्र बुधवारी (दि.२०) रात्री साजरी होत आहे. त्यानिमित्त मंगळवारी (दि.१९) भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शीघ्र कृती दलाच्या सशस्त्र जवानांसह संचलन केले.

रमजान ईचा सण सोमवारी (दि.२५) साजरा होणार आहे. या काळात कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होवू नये, यासाठी शीघ्र कृती दलाची एक तुकडी नाशिकमध्ये दाखल झाली आहे. या तुकडीत डेप्युटी कमान्डंट, सहायक आयुक्त दोन, पोलीस निरीक्षक ३, उपनिरीक्षक ४, महिला कर्मचारी १० व ११० पुरुष कर्मचारी आहेत. यावेळी सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक साजन सोनवणे आदी उपस्थित होते.

First Published on: May 19, 2020 9:12 PM
Exit mobile version