म्युकरमायकोसिस रुग्णांना सरकारी यंत्रणांचा फास

म्युकरमायकोसिस रुग्णांना सरकारी यंत्रणांचा फास

म्युकरमाकोसिस उपचारांत प्रभावी ठरणारे अ‍ॅम्फोटेरेसिन-बी इंजेक्शन मिळवताना रुग्णांचा जीव कंठाशी आलेला असतानाही, यंत्रणा मात्र हातावर हात ठेवून आहेत. शहरातील ३५ रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या २०१ रुग्णांना दररोज किमान ९6० इंजेक्शन्सची गरज असताना, प्रत्यक्षात मात्र अवघे १४० इंजेक्शन्स दिले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

कोरोना संसर्गामधून बर्‍या झालेल्या सहव्याधी (कोमॉर्बिड), मधुमेह असलेल्या अनेक रुग्णांना म्युकर मायकोसिस अर्थात काळी बुरशी या गंभीर आजार होतो आहे. शहरातील ३५ हॉस्पिटल्समध्ये सद्यस्थितीत 201 रुग्ण उपचार घेत आहेत. या प्रत्येक रुग्णाला दररोज कमीत कमी ५ अ‍ॅम्फोटेरेसिन इंजेक्शन्स द्यावे लागतात. त्यानुसार सर्व हॉस्पिटल्सकडून महापालिकेकडे दररोज किमान साडेनऊशे ते एक हजार अ‍ॅम्फोटेरेसिनची मागणी नोंदवली जाते. प्रत्यक्षात मात्र केवळ १3० ते 140 दीडशे इंजेक्शन्स सरकारी यंत्रणांकडून वितरित केले जातात. सरकारी यंत्रणांची अनास्था आणि असमन्वयामुळे रुग्णांना पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर इंजेक्शन्स मिळत नसल्याची तक्रार खुद्द रुग्णालयाकडून केली जाते आहे.

उपाययोजनाही कुचकामी :

अ‍ॅम्फोटेरेसिन इंजेक्शन्सचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रेमडेसिवीरप्रमाणे वितरण व्यवस्था केली. मात्र, तरीही पुरेसे इंजेक्शन्स उपलब्ध होत नसल्याने हॉस्पिटल्ससह रुग्णांच्या नातेवाईकांचीही घालमेल सुरू आहे.

 

First Published on: June 4, 2021 6:59 PM
Exit mobile version