मनपा आयुक्त चक्क रिक्षाने दौऱ्यावर

 मनपा आयुक्त चक्क रिक्षाने दौऱ्यावर

नाशिक : महापालिकेची मोटार, ना सिक्युरिटी गार्ड… एक साधारण नागरिक म्हणून गोदाकाठी काय दिसते याचा अनुभव महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त रमेश पवार यांनी घेतला. नदीपात्रातच धुतले जाणारे कपडे, कोणीही ठाण मांडणारे भिक्षेकरी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे फेरीवाले, खूपच विदारक चित्र असल्याच्या भावना आयुक्तांनी व्यक्त केल्या आणि त्यानंतर तडक महापालिकेत येऊन हा परिसर फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिककरांच्या दृष्टीने गोदावरी हा अत्यंत संवेदनशील आणि श्रद्धेचा विषय. गेल्या काही वर्षांपासून गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच सध्या प्रोजेक्ट गोदाचे काम सुरू असल्याने नवनवीन वाद देखील उभे राहत आहेत.हा सर्व विषय बाजूला ठेवला तरी गोदाकाठी गेल्यानंतर तेथील चित्रही खूप वेगळे आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्यामार्फत सुरू असलेल्या
वादासंदर्भात प्रशासक तथा आयुक्त रमेश पवार यांनी नुकतीच पाहणी केली असली तरी त्यावेळी अनुभवलेला गोदाकाठ आणि प्रत्यक्ष सामान्य नागरिक म्हणून आलेला अनुभव वेगळाच होता.

गोदाकाठी अनेक मंदिरे असल्याने पूजेची साहित्य विकणारी दुकाने असली तर हरकत नाही. मात्र, अनेक फेरीवाले आढळले असून त्यामुळेच दोन्ही विभागीय अधिकायांना तातडीने पोलिसांची मदत घेऊन परिसर फेरीवालामुक्त करण्याचे आदेश दिले आहेत : रमेश पवार (प्रशासक तथा आयुक्त मनपा)

First Published on: April 19, 2022 11:29 AM
Exit mobile version