महापालिकेनेच केली ५० वृक्षांची कत्तल

महापालिकेनेच केली ५० वृक्षांची कत्तल

नवीन नाशिक येथील माऊली लॉन्स परिसरात रस्त्यात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून तब्बल ५० झाडे तोडण्यात आल्याने वृक्षप्रेमींकडून हळहळ व निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, वृक्ष प्राधिकरण समितीच्या परवानगीने रस्त्यात अडथळा ठरणारी एकूण ५० झाडे तोडण्याची परवानगी मिळाली असल्याची माहिती उद्यान निरीक्षकांनी दिली आहे.

एकीकडे नुकताच पर्यावरण दिन मोठा गाजावाजा करून साजरा करण्यात आला. आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच महापालिकेकडून तब्बल ५० वृक्षांची कत्तल करण्यात आली. पावसाळ्यात वृक्ष प्रेमीकडून सर्वत्र वृक्षलागवड करण्यात येत असताना दुसरीकडे रस्त्याला अडथळा ठरणारे ३३ झाडे तसेच खासगी जागेतील १७ अशा एकूण ५० वृक्षावर कुर्‍हाड चालवण्याची परवानगी देण्यात आल्याने वृक्षप्रेमीनी नाराजी व्यक्त करत वृक्षतोड त्वरीत थांबविण्याची मागणी केली आहे. वृक्षतोडी संदर्भात मनपाने वृक्षतोडीची नोटीस केव्हा काढली, तयार नागरिकांच्या हरकती मागविण्यात आले का, असे प्रश्नही वृक्षप्रेमींनी उपस्थित केले आहेत.

First Published on: June 12, 2021 4:59 PM
Exit mobile version