नाशिक बाजार समिती निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू

नाशिक बाजार समिती निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू

त्र्यंबकेश्वर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली तरी खर्‍या अर्थाने निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला त्र्यंबकेश्वर तालुक्यातून हरसूल व खंबाळे येथून समविचारी सभा घेऊन सुरुवात झाली आहे. सत्ताधारी पिंगळे गटाने हरसूल येथे बुधवारी ‘आपला पॅनल’ची घोषणा केली. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

समविचारी सभेवेळी सभापती देविदास पिंगळे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, सहकार क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव आणि नियोजनाच्या जोरावर आपल्या कार्यकाळात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असलेली सहाशे कोटी रुपये ठेव रक्कम ही ३,३०० कोटीपर्यंत नेली. शेतकर्‍यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून  सुलभ पद्धतीने कर्ज वितरण केले. नाशिक साखर कारखान्याचा सभापती असताना दोन वेळा कारखाना नफ्यात आणला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज करत असताना विविध विकासकामे केली. शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करत नाशिकरोड, त्र्यंबक, हरसूल उपबाजार सुरू केला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न वाढविले व मालमत्तादेखील वाढवली. ज्या मागील सत्ता काळात बाजार समितीचे उत्पन्न घटले होते.ते पुन्हा वाढवले.
त्रंबक उपबाजार आवार विकास साधत मोठ्या वास्तूचे काम सुरू असल्याचे सांगत त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला. सभेस आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे, संचालक संपतराव सकाळे, बहिरू पाटील-मुळाणे, पुंडलिक साबळे, विनायक माळेकर, तुकाराम पेखळे, रवींद्र भोये, संजय तुंगार, विश्वास नागरे, युवराज कोठुळे,  समाधान बोडके, विष्णुपंत म्हैसधुने, अरुण मेढे, पांडू झोले, मनोहर मेढे, निवृत्ती लांबे, मोहन बोडके, भास्कर मेढे, शरद मेढे, संजय मेढे, भावडू बोडके आदी उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर, हरसूलवासियांनी विद्यमान सभापती देवीदास पिंगळे यांना बिरसा मुंडा यांची मूर्ती भेट देत या भागातून जनाधार असल्याचा शब्द दिला. यावेळी  मनोहर महाले, भिका पाटील महाले, मनोहर चौधरी, भास्करराव गावित, नामदेव हलकांदर, समधान बोडके, मुख्तार सैय्यद, देविदास जाधव, मिथुन राऊत, दोमोधर राऊत, पेठ विकासो चेअरमन-व्हा. चेअरमन, संचालक, तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.
First Published on: November 21, 2021 10:49 AM
Exit mobile version