नाशिक-बेळगाव विमानाचे पुन्हा ‘उड्डाण’; आठवड्यातून दोनदा मिळणार सुविधा

नाशिक-बेळगाव विमानाचे पुन्हा ‘उड्डाण’; आठवड्यातून दोनदा मिळणार सुविधा

नाशिक : स्टार एअरने नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू केले असून नवीन वर्षात म्हणजेच ३ फेब्रुवारी २०२३ पासून नाशिक स्टार एअरची नाशिक-बेळगाव विमानसेवा होणार सुरू होणार आहे.आठवडयातून दोन दिवस म्हणजेच शुक्रवार आणि रविवार या दोन दिवस ही सेवा दिली जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत पाठपुरावा केला होता यावर केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्देशानुसार ही सेवा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

केंद्राच्या उडाण योजनेंतर्गत ओझर येथून अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, बेळगाव सेवा सुरू करण्यात आली मात्र उडाण योजनेची मुदत संपल्याने ३० ऑक्टोबरपासून या सेवा बंद करण्यात आल्या. मात्र उड्डाण योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली. या मागणीला यश आले असून दि. ३ फेब्रुवारी २०२३ पासून स्टार एअरलाइन प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी नाशिक बेळगाव विमानसेवा सुरू करणार आहे. त्यासाठी त्यांनी बुकिंग देखील सुरू केलेआहे. तसेच दुसर्‍या कंपन्यांच्या देखील विमानसेवा सुरू करण्यासाठी छगन भुजबळ यांचे प्रयत्न सुरू आहेत.

अशी असेल सेवा

एस ५, १४५ ही फ्लाइट बेळगावहून शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता निघेल नाशिक येथे १०.३० पोहचेल तर रविवारी सायंकाळी ५.५ वाजता सुटेल आणि सायंकाळी ६.५ वाजता नाशिकला पोहोचेल. तर एस ५, १४६ ही फ्लाइट नाशिकहून शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता निघेल ११.४५ ला बेळगाव येथे पोहचेल. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता निघेल आणि सायंकाळी ७.३० वाजता बेळगावला पोहचेल. या मार्गावर ५० सीटर एम्ब्रेअर १४५ विमाने धावणार आहेत.

First Published on: November 24, 2022 7:25 PM
Exit mobile version