मृत्यूदर घटला, नाशिकचा कोरोना मृत्यूदर १.४५ टक्कयांवर

मृत्यूदर घटला, नाशिकचा कोरोना मृत्यूदर १.४५ टक्कयांवर

शहरात दररोज हजार-दीड हजार नवे कोरोनाबाधित सापडत असले तरीही, मृत्यूदर मात्र राज्याच्या तुलनेत कमी असल्याची दिलासादायक बाब पुढे आली आहे.

४ जुलैअखेर आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शहरातला मृत्यूदर ५ टक्क्यांवर होता. हाच दर आता अवघा १.४५ टक्क्यांवर आलाय. राज्याचा मृत्यूदर २.६८ टक्के असल्यानं, त्या तुलनेत शहराचा मृत्यूदर कमी असल्यानं ही बाब कोरोना रोखण्यासाठी कार्यरत प्रत्येकासाठी अभिमानास्पद ठरावी. दरम्यान, नाशिक शहरात एकूण ४६ हजार कोरोनाबाधित आढळले असून, ४० हजारांहून अधिक बाधित पूर्णपणे बरे झालेत.

First Published on: September 24, 2020 6:23 PM
Exit mobile version