कोरोना झाल्याच्या संशयावरुन शेजाऱ्यांना मारहाण; संशयितांना अटक

कोरोना झाल्याच्या संशयावरुन शेजाऱ्यांना मारहाण; संशयितांना अटक

कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरुन शेजाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. शेजारी राहणारे कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरुन त्यांच्या कुटुंबास शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा प्रकार नाशिकच्या सिडकोतील मारहाण प्रताप चौक येथे घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संशयितांना अटक केली आहे.

नेमके काय घडले?

कोरोनाच्या महामारीत माणसाचा माणसावरील विश्वास उडाला असल्याचे निदर्शनास आले आहे. नाशिकच्या महाले फार्म येथे राहणाऱ्या एका व्यक्तीस शेजारील आप्पा मोतीराम बच्छाव यांच्यासह त्यांची दोन मुले निशांत आणि प्रशांत आणि दोन्ही सुनांनी ‘तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असताना येथे राहतातच कसे’, असा आरोप करीत शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. ‘तुम्ही येथे राहतातच कसे, तेच बघतो’, अशी दमबाजीही केल्याचे समोर आले. याप्रसंगी आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यावर फरशीच्या तुकड्याने दुखापत केली. हा वाद सोडविण्यास संबंधिताचा मुलगा गेला असता, त्यालाही मारहाण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बेडवाल करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयितांना अटक केली आहे.


हेही वाचा – नाशिक तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींवर प्रशासक


 

First Published on: August 17, 2020 7:48 PM
Exit mobile version