नाशिक बलात्कार प्रकरण : ठिय्या आंदोलनानंतर आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजप नगरसेविका, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नाशिक बलात्कार प्रकरण : ठिय्या आंदोलनानंतर आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजप नगरसेविका, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजप नगरसेविका, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नाशिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करून पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी अंबड पोलिस ठाणे येथे ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी नाशिकमधील भाजपा आमदार सीमा हिरे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ नुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कारातील गुन्ह्यासंदर्भात पोलीस यंत्रणेकडून तपास सुरु असताना भाजपच्या वतीने आमदार सीमा हिरे,शहराध्यक्ष गिरीष पालवे,नगरसेविका छाया देवांग, प्रतिभा पवार,नगरसेविका अलका अहिरे,कावेरी घुगे,नगरसेवक मुकेश शहाणे, हर्षा फिरोदिया, जगन पाटील, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, शिवाजी बरके, राकेश ढोमसे, डॉ. वैभव महाले, ऍड.अतुल सानप, राहुल गणोरे, किरण गाडे, पिंटु काळे, अमोल पाटील, बाळासाहेब पाटील व इतर १० ते १५ पुरूष व महिला कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन ठिय्या आंदोलन केले.

त्यामुळे या गंभीर गुन्हयाच्या तपासाच्या वेगाला बाधा आणली तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले असे आरोप करून वरील सर्वांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास अंबड पोलीस करीत आहेत.भाजपाच्या या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी ६ च्या दरम्यान अंबड पोलीस ठाण्यात पोहचत बलात्कार प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा, आरोपी अटक करत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधुन जाणार नाही, असे म्हणून ठिय्या आंदोलन केले होते. तसेच सरकारविरोधी घोषणा देऊन, पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला.


 

First Published on: September 29, 2021 9:04 AM
Exit mobile version