कायदा व व्यवस्थेची जबाबदारी पोलिसांसह नाशिककरांची – सरंगल

कायदा व व्यवस्थेची जबाबदारी पोलिसांसह नाशिककरांची – सरंगल

आगामी सण-उत्सवादरम्यान शहरात कायदा व व्यवस्थेची जबाबदारी पोलिसांसह नाशिककरांची आहे, असे मत अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी व्यक्त केले. ते नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या पाहणीसाठी तीन दिवसांच्या नाशिक दौर्‍यावर आहेत. शुक्रवारी (ता.९) त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये येत गुन्ह्यांच्या संदर्भात माहिती घेतली.

भद्रकाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. कुलवंतकुमार सरंगल यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त असताना शहरात स्थापन केलेल्या शांतता समितीच्या सदस्यांसोबत चर्चा केली.

व्यासपीठावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे आदी आदी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, क्राईम ब्रँच युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बडेकर, शांतता कमिटी सदस्य अशोक पंजाबी, दिलीप साळवे, शहरे खतीब, माजी नगरसेवक बिलाल खतीब, मधुकर भालेराव, शंकर बर्वे, शरयू डांगळे, अंजली शिंदे, नगरसेविका समीना मेमन, वसिम पिरजादे, एजाज मकराणी, एजाज काजी, शोकत सय्यद उपस्थित होते.

First Published on: August 10, 2019 3:16 PM
Exit mobile version