आयसीएसई: निकालात नाशिकची उत्तुंग भरारी

आयसीएसई: निकालात नाशिकची उत्तुंग भरारी

नाशिकlइंडियन सर्टिफिकिट ऑफ सेकंडरी एज्यूकेशन (आयसीएसई) बोर्डाने शुक्रवारी (दि.10) इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचा निकाल जाहीर केला. दहावीचा निकाल 99.34 टक्के तर बारावीचा निकाल 96.84 टक्के लागला आहे. देशभरात आयसीएसई बोर्डाचे दहावीचे एकूण 2 लाख 6 हजार 525 तर बारावीचे एकूण 85 हजार 611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात दहावीचे 23 हजार 319 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावीचे तीन हजार 104 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत नाशिक महानगरातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश पटकावले आहेत.

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनतर्फे (आयसीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी – बारावीच्या परीक्षांचा निकाल शुक्रवारी दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात आला. यात नाशिकमधील रायन इंटरनॅशनल स्कूल, अशोका युनिव्हर्सल स्कूल, विज्डम हाय इंटरनॅशनल स्कूल, होरायझन अ‍ॅकेडमी, सिल्वर ओक आदी शाळांनी आपली शंभर टक्के निकालांची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे बहूतांश विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे. परंचु कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांना एकत्रित येऊन जल्लोष साजरा करता आला नाही. त्यामुळे निकालाच्या आनंदावर काहीसे विरजन पडल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना आपअपल्या कुटुंबियांसमवेतच घरी बसून ऑनलाईन निकाल पाहून आनंद साजरा केला.

मविप्र संचलित होरायझन अकॅडमी शाळेचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून अश्लेषा शेळके हिने 98.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर आदित्य मुंदडा 97.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच चिन्मयी शेखर मगर 96.80 टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाने, सिद्धी आव्हाड व क्रिष्णा किरण हेडा 96.60 टक्के गुणांसह चौथ्या क्रमांकाने, अभिजित पाटील व स्वराज देशमानकर 94.80 टक्के गुणांसह पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. शाळेची ही आय सी एस ई ची सातवी बॅच असून विद्यालयातील 82 विद्यार्थ्यांपैकी 28 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त, 42 टक्के विद्यार्थ्यांना उत्कृष्ट श्रेणीत तर 12 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, संचालक मंडळ, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ.नानासाहेब पाटील, प्राचार्या डॉ.सुरेखा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

First Published on: July 10, 2020 7:39 PM
Exit mobile version