युवा कौशल्य : पुणे, मुंबईपेक्षाही नाशिक पुढे

युवा कौशल्य : पुणे, मुंबईपेक्षाही नाशिक पुढे

पवार यांचा सत्कार करताना गजानन शेलार

युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युथ फेस्टिवल हे सर्वात्तम व्यासपीठ आहे. नाशिकच्या युवकांमध्ये पुणे आणि मुंबईकरांपेक्षाही चांगले कौशल्य असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अजीत पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केले.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक व्हिजन युथ फेस्टिवलमध्ये ते बोलत होते. यापुर्वी अशा प्रकारचे महोत्सव पुणे आणि मुंबईतच बघितले होते, असे सांगत नाशिककरांनी अशा महोत्सवांमध्ये सातत्य ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. शिंदेवाडीचे शहीद जवान केशव गोसावी यांच्या विरपत्नीचा सन्मान शेफाली भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोसावी यांच्या कन्येची भविष्यातील शैक्षणिक खर्चाची जबाबदारी आपण घेत असल्याचे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष नंदन भास्करे यांनी केले होते.

व्यासपीठावर अजिंक्य राणा पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, निवृत्ती अरिंगळे, कैलास मुदलीयार, बबलू शेलार, अभिषेक बोके, सुहास उभे, पुरुषोत्तम कडलग, नाशिक व्हिजनचे अध्यक्ष चेतन व्यवहारे, उपाध्यक्ष गौरव सोनार, सरचिटणीस ललित मानकर, आकाश कदम, नितीन घेगडमल, तेजस्वीनी कुमावत आदी उपस्थित होते.

युवा महोत्सवाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
First Published on: January 26, 2019 1:35 AM
Exit mobile version