नेट परीक्षा: आधीच काठिण्य पातळी; त्यात तांत्रिक दोष

नेट परीक्षा: आधीच काठिण्य पातळी; त्यात तांत्रिक दोष

नेट परीक्षा: आधीच काठिण्य पातळी; त्यात तांत्रिक दोष

राष्ट्रीय पात्रता परीक्षे (नेट)च्या काठीण्य पातळीत वाढ झाल्याने विद्यार्थ्यांना घाम फुटलेला असतानाच परीक्षेतील तांत्रिक दोषांमुळे संबंधितांची चांगलीच धांदल उडत आहे. प्रश्नपत्रिकेतील उतारे आणि कॉम्प्युटर स्क्रिनचा छोटा आकार याचा ताळमेळच जुळत नसल्याने विद्यार्थ्यांचा बहुतांश वेळ स्क्रोल करण्यातच जात आहे. त्यामुळे मोठा वेळ दवडला जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

नाशिक शहरातील वडाळा गावानजीकचे ‘अशोका बिझिनेस एन्क्लेव्ह’ हे ऑनलाईन परीक्षेचे एकमेव परीक्षा केंद्र आहे. येथे गुरुवार (दि.20) ते 28 जूनपर्यंत दोन सत्रात ही परीक्षा घेतली जात आहे. राष्ट्रीय स्तरावर प्राध्यापक होण्यासाठी अनिवार्य असलेल्या या नेट परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी तीन तासांचा अवधी देण्यात आला आहे. मात्र, परीक्षा सुरू होण्याच्या दोन तास अगोदर परीक्षार्थींना केंद्रावर हजर रहावे लागते. अर्थात, परीक्षा ऑनलाईन असताना दोन तास अगोदर परीक्षार्थींना बसवून ठेवल्यास त्यांचा वेळ वाया जातो. त्यांचे कागदपत्र पडताळणी करण्यासाठी एक तासांचा अवधी पुरेसा असताना विनाकारण दोन तास बसावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासचा वेळ वाया जातो. तसेच, पहिला पेपर सोडविण्यासाठी निश्चित कालावधी ठरवलेला नसल्याने दुसरा पेपर केव्हापासून सोडवायचा हे परीक्षार्थींच्या लक्षात येत नाही.

जनरल प्रश्नांवर आधारीत पहिल्या पेपरमधे 50 प्रश्न विचारले जातात. तसेच दुसरा पेपर दोनशे गुणांचा (100 प्रश्न) असल्यामुळे त्याला जास्त वेळ देणे अपेक्षित आहे. पेपर एकमध्ये उतार्‍याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे. मात्र, उतारा वाचताना संगणकाची स्क्रीन अपूर्ण पडते, त्यामुळे एका नजरेत उतारा वाचन करता येत नाही. परिणामी,परीक्षार्थींची वाचन प्रक्रिया खंडीत होऊन त्याला वारंवार स्क्रीनवर वाचनाचा व्यत्ययास सामोरे जावे लागते. तसेच पेपर दोनची काठिण्य पातळी कमालीची वाढल्याने निकालाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता वाढली आहे.

रविवारी सेट परीक्षा

राज्यस्तरावर घेण्यात येणारी राज्य पात्रता परीक्षा (सेट) येत्या रविवारी (दि.23) घेण्यात येणार आहे. या दिवशी ‘नेट’ परीक्षा होणार नाही.

परीक्षेतील उणिवा

First Published on: June 22, 2019 10:30 AM
Exit mobile version