‘नाम में क्या रखा है?’ मतदार जनजागृतीचा अनोखा फंडा

‘नाम में क्या रखा है?’ मतदार जनजागृतीचा अनोखा फंडा

'नाम में क्या रखा है?' मतदार जनजागृतीचा अनोखा फंडा

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि मतदार याद्या दोषविरहित करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सध्या जोरात सुरू आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून मतदार यादीमधील मृत आणि दुबार मतदारांची वगळणी करणे आणि त्या अनुषंगाने मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून नाशिक जिल्हा प्रशासन व सिटीझन फोरमच्यावतीने ‘नाम में क्या रखा है’ हा उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाच्या माध्यमातून मोबाईल व्हॅन मतदारांपर्यंत जाऊन मतदारांना आवश्यक नमुना क्र. -7 अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांच्याकडून मतदार यादीतील नाव दुरूस्ती किंवा मयत व्यक्तिंचे नाव वगळण्याची प्रक्रीया अशा दुरूस्त्या करण्यात येणार आहे.

नाम में क्या रख है मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती करताना निवडणूक कर्मचारी

अनेकदा मतदारांना त्यांच्या नावातील बदल अथवा मतदार यादीतील अन्य दुरुस्त्यांसाठी कार्यालयात येण्यासाठी वेळ मिळत नसल्याने त्या दुरुस्त्या तशाच राहून जातात. त्यामुळे मतदारांनी कार्यालयात येण्यापेक्षा मतदारांपर्यंत पोहोचण्याची काही व्यवस्था करता येईल काय याबात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये चर्चा झाली. या चर्चेतून नाम में क्या रखा है ही संकल्पना पुढे आली. शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे मतदारांकडून अर्ज स्वीकारले गेल्यास मतदारांना मतदार यादीतील दुरुस्तीबाबत अर्ज सादर करणे सुकर होईल. २३ जूलैपासून ही मोहीम हाती घेण्यात आली असून याद्वारे नागरिकांमध्ये मतदार यादीसंदर्भात जागृती करण्यात येणार आहे. ३० जुलैपर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुद्धिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ४० हजार मृत, दुबार मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असून २८ हजार नवमतदारांची नावे नोंदवण्यात आली आहेत.

नागरिकांनी मोहिमेचा लाभ घ्यावा

या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतदारांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, की आपण या मोहिमेचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबातील तसेच परिचयातील कुटुंबातील व्यक्ती मृत्यू झालेली असेल, तर अशा मृत व्यक्तीच्या नावांची मतदार यादीमधून वगळणी करावी आणि मतदार यादी अधिकाधिक परिपूर्ण बनवण्याच्या नाशिक जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या मोहिमेस सहकार्य करावे. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

First Published on: July 24, 2019 7:40 PM
Exit mobile version