..तर पैसे असूनही तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही.. वाचा काय आहे कारण

..तर पैसे असूनही तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही.. वाचा काय आहे कारण

शहरात स्वातंत्र्य दिनी अर्थात १५ ऑगस्टपासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ धोरण राबवण्यात येणार आहे. या धोरणाला पेट्रोल डिलर्स असोसिएशनने विरोध दर्शवला होता. मात्र, पोलीस आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर पंपचालकांचा विरोध मावळला असून, पोलीस आणि पंपचालक ही मोहिम एकत्रित राबवणार आहेत.

पोलीस आयुक्त कार्यालयात शहरातील सर्व पेट्रोल पंपचालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ धोरण स्पष्ट करताना पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी गेल्या काही वर्षातील दुचाकींच्या अपघातांतील मृतांची आकडेवारी मांडली. तसेच, हे धोरण राबवतांना पंपचालकांच्या संरक्षणाची हमीही त्यांनी यावेळी दिली. देशात अनेक शहरात ही योजना अयशस्वी झाल्याचे सांगत नाशिकमध्ये ही योजना यशस्वी करण्यासाठी पंपचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी सदर धोरण जनहितासाठी अंमलात आणण्यासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

प्रत्येक पेट्रोल पंपावर त्या प्रमाणात पोलिसांची नियुक्ती करण्याचेही निश्चित करण्यात आले. पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे नितीन धात्रक, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष विजय ठाकरे, जिल्हाध्यक्ष भूषण भोसले, सेक्रेटरी सुदर्शन पाटील व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

First Published on: July 28, 2021 10:31 PM
Exit mobile version