धान्य मिळत नाही ; येथे करा संपर्क

धान्य मिळत नाही ; येथे करा संपर्क

भिवंडीत धान्याचा काळाबाजार; नऊ टन रेशनिंगचे तांदूळ ताब्यात

केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र, अनेकदा धान्य मिळण्यात अडचणी येताहेत. त्यामुळे याबाबत तक्रार कोठे करावी असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. याकरीता नाशिक महापालिका हद्दीत शिधापत्रिकाधारकांना धान्य घेण्यास कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून धान्य वितरण अधिकारी यांनी तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे आता धान्य मिळण्यात अडचणी आल्यास नागरिक थेट तक्रार करू शकणार आहेत.

लॉकडाउनच्या काळात कोणीही उपाशी राहू नये, याकरीता अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्राधान्यक्रम कुटुंब आणि अंत्योदय गटातील कुटुंबांना तीन महिन्याचे धान्य देण्यास सुरुवात केली. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत पाच किलो तांदूळही मोफत देण्यात येत आहे. तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षेत समावेश झालेला नाही, अशा लाभार्थ्यांना करोनाच्या अनुषंगाने घोषित केलेल्या टाळेबंदीच्या काळात मे व जून महिन्याकरीता प्रतिव्यक्ती 3 किलो गहु प्रति ८ रुपये किलो 2 किलो तांदूळ १२ रुपये किलो अशा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. या धान्याचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे. मात्र, अनेकदा नागरिकांना धान्य न मिळणे किंवा तत्सम अडचणींना तोंड द्यावे लागते याकरीता नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील धान्य वितरण अधिकारी, कार्यक्षेत्रात येणारे सर्व केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य घेण्यास कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली.

जिल्ह्यात सुमारे ४ लाख ७५ हजार शिधापत्रिकांधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याकरीता ५८४४ मे. टन गहू आणि ३८९६ मे. टन तांदळाची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. टप्प्या-टप्प्याने हे धान्य उपलब्ध होत असून ते धान्य दुकानांपर्यंत पोहचवण्यात येत असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

येथे साधा संपर्क
ए. वाय. येवले (खैरनार )९९२२५८६६११
गणेश आव्हाड ९४०४६८८५७५

First Published on: April 27, 2020 6:38 PM
Exit mobile version