नाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे वृद्ध महिला झाली करोडपती

नाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे वृद्ध महिला झाली करोडपती

नाशिक : येथील नाशिक-पुणे रेल्वे मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेच्या दिशेने जिल्हा प्रशासनाची आश्वासक पावलं पडू लागली आहेत. या मार्गासाठी जमिनींचा मोबदला जाहीर झाल्यानंतर सिन्नर तालुक्यातील बारगाव पिंप्री येथे भूसंपादनाचा श्रीगणेशा करण्यात आला. तालुक्यातील कमळाबाई कु-हाडे यांचे गट नंबर ६७३ मधील बारमाही बागायती असलेले ०.५९०० हेक्टर आर. क्षेत्र खरेदी करुन भूसंपादन विभागाने १ कोटी १ लाख ८४ हजार ७६० रुपये त्यांच्या खात्यात जमाही केले. त्यामुळे आता इतर शेतकऱ्यांनीही जमीन खरेदीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी केले आहे.

नाशिक-पुणे नवीन दुहेरी मध्यम द्रुतगती ब्राडगेज लाईनचे विद्युतीकरणासह बांधकामासाठी जिल्ह्यातील सिन्नर आणि नाशिक तालुक्यातील २३ गावांतील जमीनथेट वाटाघाटीद्वारे खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने नुकतेच ६ गावांचे जमीनींचे दरही जाहीर केले आहे. गेल्या तीन वर्षांत झालेले खरेदी विक्रीचे व्यवहार विचारात घेऊन सुमारे ५२ ते ६८ लाख तर बागायती जमिनींना कोटीरुपयांचा दर जाहीर करण्यात आला आहे. परंतू काही शेतकऱ्यांनी समृध्दी महामार्गासाठी देण्यात येणारा दर द्यावा अशी मागणी केली तर काही शेतकऱ्यांनी पुण्याप्रमाणे दर देण्याची मागणी करत जमीन देण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे नाशिकमध्ये भूसंपादन प्रक्रिया रखडते की काय अशी शक्यता व्यक्त केली जात असतांना उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांनी सिन्नर तालुक्यात भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत प्रकल्पाबाबत माहिती दिली. त्यांच्या दराबाबतचे गैरसमजही त्यांन दूर केले. त्यामुळे आता या प्रकल्पाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सिन्नरच्या कमळाबाई कुन्हाडे या महिला शेतकऱ्याने लागलीच आपले बारमाही शेताची खरेदीही नोंदवली. सिन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात महारेलचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सचिन कुलकर्णी, सेवानिवृत्त तहसीलदार उदय कुलकर्णी यांच्यासह महसूल विभागाच्याअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खरेदीखत नोंदविण्यात आले. २८६ हेक्टर भूसंपादन नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरवात होणार आहे. शासनाकडून वाटाघाटींद्वारे थेट खरेदीने भू-संपादन करण्याचे नियोजन आहे.

जिल्ह्यातील २२ गावांतून हा रेल्वेमार्ग जाणार असून, त्यात सर्वाधिक १७ गावे सिन्नर तालुक्यातील 

वडगाव पिंगळा, चिंचोली, मोह, वडझिरे, देशवंडी, पाटपिंप्री, बारागावपिंप्री, कसबे सिन्नर, कुंदेवाडी मजरे, मुसळगाव, गोंदे, दातली, शिवाजीनगर, मानोरी, दोडी खुर्द, दोडी बुद्रुक, नांदूरशिंगोटे या गावांची संयुक्ती मोजणी करीत २४८.९० हेक्टर जमीन संपादित होणार आहे. तर नाशिक तालुक्यातील विहितगाव, देवळाली, बेलतगव्हाण, नाणेगाव, संसारी या गावांतील ३७.२२, असे एकूण २८६.१२ हेक्टर क्षेत्र संपादित होणार आहे.

First Published on: May 5, 2022 1:19 PM
Exit mobile version