Video | नाशिक त्र्यंबक रस्त्यावर झालेल्या अपघातात एक ठार, दोघे जखमी

Video | नाशिक त्र्यंबक रस्त्यावर झालेल्या अपघातात एक ठार, दोघे जखमी

नाशिकत्र्यंबक रस्त्यावर झालेल्या अपघातात नाशिकमध्ये कामटवाडा येथील डॉ. संजय पोपटराव शिंदे (वय ४५) हे ठार झाले असून इतर दोघे जखमी झालेले आहेत. जखमींमध्ये पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांचे चिरंजीव रोहित गावीत आणि डॉ. जतिन संख्ये यांचा समावेश आहे.

नाशिकहून त्र्यंबककडे भरधाव वेगाने जात असलेल्या स्कोडा कारचे टायर फुटल्याने अंजणेरी शिवरातील बेझे फाट्याजवळील छोट्या पूलाचा कथडा तोडून गाडी नाल्यात जाऊन कोसळली. अपघातमध्ये तीघांनाही जबर मार लागला होता. परिसरातील नागरिकांनी तत्काळ 108 क्रमांकाला फोन करत रुग्णवाहिका मागवली. नागरिकांनी तिघांनाही नाल्यातून बाहेर काढले आणि रुग्णवाहिका चालकाने वेगाने नाशिक जिल्हा रुग्णालय येथे पोहचवले. डॉक्टरांनी शिंदे यांना मृत घोषित केले. इतर दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

First Published on: August 24, 2019 4:31 PM
Exit mobile version