खारीफाटा येथे बसच्या धडकेत युवक ठार

खारीफाटा येथे बसच्या धडकेत युवक ठार

बोरिवली येथे बाईकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

देवळा-सौंदाणे रस्त्यावरील खारीफाटा येथे बस आणि मोटारसायकल यांच्या अपघातात एक युवक ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. देवळ्याकडून सौंदाणेकडे जाणाऱ्या कळवण आगाराच्या बसने (एम. एच. ४१, बी. टी. ४५२) सौंदाणेकडून मेशी (ता. देवळा) येथील घराकडे परतणाऱ्या महेंद्र उर्फ बजरंग कैलास पवार (२१) राकेश सुरेश शिंदे (२४) व अक्षय बाळू बोरसे (२१) यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात महेंद्र पवार हा युवक जागीच ठार झाला, तर राकेश शिंदे व अक्षय बोरसे हे गंभीर जखमी झाले. खमींना उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एकाची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले.

First Published on: January 15, 2019 8:40 PM
Exit mobile version