माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या गाडीला अपघात, तरुण गंभीर

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या गाडीला अपघात, तरुण गंभीर

नाशिकचे माजी पालकमंत्री तथा माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या गाडीला रविवारी (दि.२७) पाचोरा तालुक्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पाचोरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोहारा-वरखेडे रस्त्यावर संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

भाजपचे आमदार गिरीश महाजन हे मुंबई येथील कामकाज आटोपून जामनेर येथे घराकडे परतत होते. लोहारा–वरखेडे रस्त्यावर पाठीमागून आलेल्या एका दुचाकीस्वार बी. सी. पवार यांनी त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या त्यात पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघात झाल्याचे लक्षात येताच गिरीश महाजन यांनी स्वत: पवार याला मदत केली. आपल्या गाडीत बसवून त्याला तत्काळ पाचोरा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पवार हा आरोग्य कर्मचारी असून, तो वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरी करतो.

First Published on: September 27, 2020 9:16 PM
Exit mobile version