कांदा दर वधारले

कांदा दर वधारले

नाशिक : कांद्याच्या दरात होत असलेली घसरण थांबवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीला देण्यात येणारी ५ टक्के सबसिडी ही १० टक्के शुक्रवारी संध्याकाळी जाहीर केल्याने लासलगाव बाजार समितीत आज शुक्रवारच्या तुलनेत लाल कांद्याच्या दरात २०० रुपयांची तर उन्हाळ कांद्याच्या दरात १०० रुपयांची बाजारभावात वाढ झाली मात्र या दरवाढीने कांद्याचे येणारे उत्पादन खर्चही निघणार नसल्याने पंधराशे ते दोन हजार रुपये कांद्याला हमीभाव जाहीर करा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे.

कवडीमोल बाजार भावाने विकल्या जाणार्‍या कांद्यामुळे शेतकरी संतप्त होत रस्त्यावर कांदा ओतून देत तर मिळालेल्या कांद्याचे तुटपुंज पैशाची मनी ऑर्डर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करत कांदा उत्पादकांच्या व्यथा पोहोचविण्याचा प्रयत्न केल्यानंतर केंद्र सरकारने गेल्या आठवड्यातील शुक्रवारी संध्याकाळी कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी निर्यात वाढीसाठी असलेल्या पाच टक्के अनुदानाची मुदत १२ जानेवारी रोजी संपत असताना केंद्र सरकारने दहा टक्के अनुदान जून पर्यंत देत निर्यातवाढीसाठी चालना दिल्यामुळे लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या बाजारभावात दोनशे रुपयांची प्रतिक्विंटलमागे तर उन्हाळ कांद्याच्या दरात शंभर रुपयांची प्रति क्विंटल मागे बाजारभावात वाढ होत लाल कांद्याला जास्तीजास्त १००० रुपये , सरासरी ९४५ रुपये तर कमीतकमी ५०० रुपये प्रती क्विंटलला बाजार भाव मिळाला तर उन्हाळ कांद्याला जास्तीजास्त ३९२ रुपये , सरासरी २५० रुपये तर कमीतकमी १०१ रुपये प्रती क्विंटलला बाजार भाव मिळाला आहे.

First Published on: January 1, 2019 7:10 AM
Exit mobile version