गुंतवणुकीची ‘सुवर्ण’संधी, आजही सोनं स्वस्त, हे आहेत नाशिकमधील दर..

गुंतवणुकीची ‘सुवर्ण’संधी, आजही सोनं स्वस्त, हे आहेत नाशिकमधील दर..

Gold Price Today: ऐन सणासुदीत सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरांतही घसरण

गेल्यावर्षी याच कालावधीत ५६ हजारांवर गेलेले सोन्याचे दर आता मात्र ४६ हजारांपर्यंत घसरले आहेत. सोन्याच्या दरातील ही घसरण गुंतवणुकदारांसाठी मात्र चांगलीच सुवर्णसंधी ठरतेय. नाशिक शहरात मंगळवारी (दि.२१) २४ कॅरेट सोन्याचे प्रती १० ग्रॅमसाठीचे दर ४६ हजार ७०० रुपयांदरम्यान होते. त्यामुळे खरेदीसाठी अनिष्ट मानल्या जाणाऱ्या पितृपक्षातही सराफी व्यवसाय तेजीत असल्याचं चित्र आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर ४७ हजारांपर्यंत पोहोचले होते. मात्र, पितृपक्ष सुरू होताच या दरांत घसरण झाल्याचं दिसून आलं. याच कारणामुळे सोन्याच्या दरांमध्ये मोठा चढ-उतार सुरू आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरांतही घसरण झाली आहे. गेल्या गुरुवारी चांदीचे दर प्रति किलो ६३ हजार रुपये होते. शुक्रवारी हे दर ६१ हजार ७०० रुपयांपर्यंत घसरले होते. मात्र, सोमवारी पुन्हा तेजी आल्यानं हे दर ६३ हजारांपर्यंत पोहोचले होते. सोन्याच्या या दरांवर ग्राहकांना ३ टक्के जीएसटी द्यावा लागेल.

सोन्याच्या किंमती दुपटीने वाढणार?

सोन्या-चांदीच्या क्षेत्रात कार्यरत जाणकारांच्या मते आगामी ५ वर्षांत सोन्याच्या किंमती दुप्पट होण्याची शक्यता आहे. सोन्याचे हे दर प्रती १० ग्रॅमसाठी ७० हजारांवर जाण्याचा अंदाज आहे. कोरोनामुळे संकटामुळे अनेक देशांतील आर्थिक घडामोडींवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक लाभदायी ठरण्याचा अंदाज वर्तवला जातोय.

First Published on: September 21, 2021 5:35 PM
Exit mobile version