अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे नियुक्ती आदेश रखडले

अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे नियुक्ती आदेश रखडले

ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी सेविकांच्या रिक्त 1147 जागांसाठी महिला व बालकल्याण विभागाने भरती प्रक्रिया राबवली आहे. यातील सुमारे 400 जागांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली असताना या सेविकांना अद्याप नियुक्ती पत्र दिलेले नाही. नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सेविकांना मंत्र्यांकडून निर्णयाची अपेक्षा लागून आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने जुलै महिन्यात गावनिहाय रिक्त जागांची जाहिरात प्रसिध्द करत भरती प्रक्रिया राबवली. शासनाच्या नियमानुसार भरती प्रक्रियेत 20 ते 30 वर्षे वयाची अट असताना सरकारने वयाची ही अट एक वर्षांनी वाढवली. जिल्ह्यात एकूण 4 हजार 776 अंगणवाड्या आणि 506 मिनी अंगणवाड्या आहेत. यात आदिवासी क्षेत्रात 26947 अंगणवाड्या आहेत. तर बिगर आदिवासी भागात 2587 अंगणवाड्या आहेत. येथे रिक्त असलेल्या जागांसाठी महिला व बालकल्याण विभागाने पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले होते.

साधारणत: 400 जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना फक्त नियुक्ती आदेश देणे बाकी आहे. त्यांना नियुक्ती आदेश मिळण्याची प्रतीक्षा लागून आहे.निधी खर्चाला अनुमती नाहीजिल्हा नियोजन समितीतर्फे महिला व बालकल्याण विभागाला 3 टक्के निधी प्राप्त आहे. परंतु, तो कसा खर्च करावा याविषयी अद्याप गाईडलाईन्स स्पष्ट केलेल्या नसल्याने नाशिकसह राज्याती सर्व जिल्हा परिषदांचा निधी अखर्चित राहीला आहे. याविषयी महिला व बालकल्याण मंत्री ठाकूर यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

17 जानेवारी 2020 च्या शासन निर्णयानुसार अंगणवड्यांमधील रिक्त पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात रिक्त पदांसाठी पारदर्शकपणे प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. प्रक्रिया पूर्ण झालेल्या सेविकांना लवकरच नियुक्ती आदेश दिले जातील.  – दीपक चाटे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग

 

First Published on: September 2, 2021 4:03 PM
Exit mobile version