…अन्यथा पोलीसांमार्फत वाडे खाली करू; महापालिका आयुक्तांची तंबी

…अन्यथा पोलीसांमार्फत वाडे खाली करू; महापालिका आयुक्तांची तंबी

नाशिक : अशोकस्तंभ येथील वाडा कोसळल्यानंतर शहरातील जुन्या वाडयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट झाले असून रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने कारवाई न केल्यास कायद्यानुसार पोलिसांमार्फत मोकळ्या करून घेतल्या जातील, अशा सूचना मनपा आयुक्त पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत.

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक वाडे, घरे स्वतःहून उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या जातात. परंतु, यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच धोकादायक इमारती उतरवून घेण्याच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. शहरात १ हजारहून अधिक जुने वाढे असून यात पश्चिम विभाग 600, पंचवटी 198, पूर्व 117, नाशिकरोड 69, सातपूर 68, सिडको 25 असे एकूण 1077 वाडे धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे घरमालकांनी तातडीने खाली उतरवण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. नाशिक शहर परीसरात विशेषत: जुने नाशिक तसेच पंचवटी, गंगाघाट परिसरातील जुने वाडे दर पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना यापूर्वी झाल्या आहेत. अनेक घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. भाडेकरी व घर मालक यांच्यातील वादामुळे जुने नाशिक तसेच गंगा घाट परिसरातील अनेक वाडे अत्यंत जीर्ण अवस्थेत आले असले तरी त्याबाबत कारवाई होत नाही, मात्र महापालिका आयुक्तांच्या भूमिकेमुळे शहरातील हा जुना तसेच गंभीर प्रश्न मार्गी लागणार आहे.

First Published on: February 20, 2023 6:15 PM
Exit mobile version