ओझरला नवीन कोरोनाबाधित; शिरपूर कनेक्शन

ओझरला नवीन कोरोनाबाधित; शिरपूर कनेक्शन

कोरोना

ओझर येथील भगव्या चौकात एका दुकानात काही दिवसांपूर्वी कामाला असणारा २३ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित निघाल्याने पुन्हा एकदा बाहेरच्यांमुळे ओझरला शिरकाव झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. हा बाधित त्याच्या आजोबांना भेटण्यासाठी शिरपूरला गेला होता. त्याचबरोबर धुळे येथे कोरोनाबाधित नातेवाईकाच्या संपर्कात आला होता. त्याला घशाचा त्रास होऊ लागल्याने ३१ मे रोजी कोविड केअर केंद्र, पिंपळगाव बसवंत येथे दाखल केले होते. २ जुन रोजी घशाचे नमुने पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज कोरोनाबाधित आला आहे. आता तो गावात कुणाशी संपर्क आला आहे का, याची सर्कल प्रशांत तांबे, तलाठी उल्हासराव देशमुख यांनी तपासणी केली. त्याचबरोबर तो भगव्या चौकातील ज्या दुकानात कामाला होता, तेथे चौकशी केली असता दुकान मालकाने सांगितले की सदर मुलगा १६ , १७ मे रोजी पगार घेण्यासाठी आला होता. त्यानंतर तो कामावरच आला नाही. तो आजोबा आजारी असल्याने तेव्हापासून शिरपूरला जातो असे सांगून गेला अन अद्याप आमच्याकडे आला नाही. सदर बाधित व्यक्तीस ग्रामीण रुग्णालय, लासलगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी तथा तालुका संपर्क अधिकारी (कोविड-19) डॉ. चेतन काळे यांनी दिली. ओझर येथील तो रहात असलेला तांबटलेन ते भगवा चौंक शंभर मिटरचा भाग सील करण्यात आला असून आरोग्यसेवक या भागाची व संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करत आहे.
First Published on: June 4, 2020 8:36 PM
Exit mobile version